मुका इसाप अचानक बोलू लागला, तसेच आपल्याकडचे अचानक मुके झालेलेही बोलू लागतील, अशी आशा करू या. ‘नव्या’ने मिळालेला आवाज ‘धारदार’ असतो, असं म्हणतात. ‘धारदार गोष्टीं’ची वाट बघू या…
पुढे कधी तरी चमत्कार झाला आणि इसाप बोलू लागला. मनात साठवलेलं सांगू लागला. गुलामांकडे गोष्टी असतात. गुलामांना गोष्टी रचता येतात. तो गोष्टी सांगू लागला. प्राण्यांच्या गोष्टी सांगून चलाख, धूर्त, दुष्ट, कपटी माणसांना उघडं पाडू लागला. इसाप गोष्टींच्या थारोळ्यात पडला, पण मेला नाही. इसाप अजूनही जिवंत आहे. गोष्टी सांगणारा मेला, तरी त्याच्या गोष्टी छळत राहतात. असो!.......